सर्व्हिस रिव्हॉल्वर साफ करत असताना चुकून गोळी सुटल्याने पोलीस उपअधीक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश कुमार असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते पंजाब पोलिसात कार्यरत होते. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कुमार सकाळी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरची साफसफाई करत होते. त्याच वेळी अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि ती थेट त्यांच्या छातीत लागली. गोळीचा आवाज ऐकताच आसपासचे पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षक तात्काळ घटनास्थळी धावले. तेव्हा योगेश कुमार गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळले.
Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेरघटनेनंतर त्यांना तातडीने जालंधर येथील जोहल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र जखम अत्यंत गंभीर असल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने पंजाब पोलीस दलात शोककळा पसरली आहे. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे मानले जात असले तरी पोलीस प्रशासन सर्व बाजूंनी तपास करत आहे.
'लिव्ह-इन' चा धक्कादायक शेवट! २२ वर्षीय प्रियकराने २९ वर्षीय तरुणीला संपवलं, पतीपासून झाली होती विभक्तफगवाड्याच्या पोलीस अधीक्षक माधवी शर्मा यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. घटनास्थळी न्यायवैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले असून गोळी अपघाताने सुटली की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे. संबंधित अधिकारी कोणत्याही मानसिक तणावाखाली होते का, याचाही तपास केला जात आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.