बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा या साठी प्रशासनाने सर्व कामगारांची आणि कर्मचाऱ्यांसाठी सवेतन सुट्टी जाहीर केली आहे.
ALSO READ: राहुरीमध्ये मोठा पेच: देवेंद्र फडणवीसांच्या एका फोननंतर प्राजक्त तनपुरेंनी घेतली निवडणुकीतून माघार?
निवडणूक आयोगांच्या निर्देशानुसार, मतदानाच्या दिवशी मतदारसंघातील सर्व व्यापारी संस्था, औद्योगिक उपक्रम, खासगी कंपन्या, आयटी पार्क, मॉल आणि दुकाने यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य आहे. केवळ पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, अपवादात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची सवलत देणे बंधनकारक आहे.
ALSO READ: शेतजमिनीच्या विभाजनासाठी लागणारे नोंदणी शुल्क रद्द, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
या आदेशानुसार, बारामती विधानसभा मतदारसंघाचे मतदार असलेले कर्मचारी, मतदारसंघाबाहेर कामानिमित्त बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असेल.
ALSO READ: महाराष्ट्र आरोग्य योजनांकरिता एक डिजिटल व्यवस्थापन प्रणाली बनणार
जर कोणत्याही आस्थापनेने कर्मचाऱ्याला मतदानासाठी सुट्टी नाकारली किंवा वेतनात कपात केली, तर त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा आणि कामगार कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्वाना नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.