आयपीएल 2026 मध्ये 32 व्या मॅचनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत एक मोठा बदल पहायला मिळतोय. सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत लखनऊ सुपर जायंट्सचा एक 24 वर्षाचा गोलंदाज पुढे निघून गेलाय. PTI
लखनऊ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे निघून गेलाय. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात प्रिन्स यादवने कमालीची गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. PTI
प्रिन्स यादव आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत एकूण सात सामने खेळला आहे. त्या दरम्यान त्याने 13 विकेट काढले. खास बाब म्हणजे त्याने गे विकेट 8.38 च्या इकॉनमीने काढले. अंशुल कंबोजने 13 विकेट्स काढल्या आहेत. पण इकॉनमीमुळे तो दुसऱ्या नंबरवर आहे. PTI
प्रिन्स यादवचा आयपीएलमधील हा दुसरा सीजन आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतलं होतं. प्रिन्स यादवला टीममध्ये घेण्यासाठी लखनऊच्या टीमने फक्त 30 लाख रुपये खर्च केले होते. PTI
प्रिन्स यादव मागच्या सीजनमध्ये 6 सामने खेळला. त्याने 9.85 इकॉनमीने 3 विकेट काढलेत. या सीजनमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. सतत चांगलं प्रदर्शन करतोय. PTI
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.