[ad_1]

अभिनेता फरदीन खान लवकरच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारा फरदीन विविध फोटो आणि व्हिडीओ त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अशातच इन्स्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो त्याची मुलगी डियानी इसाबेला खानसोबत डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. इंटरनेटवरील हा सर्वांत गोड व्हिडीओ असल्याचं चाहते म्हणत आहेत. या व्हिडीओसोबत फरदीनने भावूक पोस्टसुद्धा लिहिली आहे. डियानीसोबत घालवलेल्या या मौल्यवान क्षणाने फरदीनला भावूक केलं आहे. आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करताना त्याने पोस्टद्वारे सांगितलं की, एका पित्यासाठी त्याच्या लेकीसोबत डान्स करणं किती मौल्यवान असतं.

फरदीनने लिहिलं, ‘लोक म्हणतात की एका पित्यासाठी आपल्या मुलीसोबत पहिला डान्स करणं हा एक अनमोल सन्मान असतो, ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी अखेर मला समजलं की लोक असं का म्हणातात? माझ्या लहानग्या ‘सनशाइन’ला (मुलीला) मोठं होताना पाहून आता 12 वर्षे झाली आहेत. हा काळ कसा गेला ते कळलंच नाही. पण ती आजही माझ्या कुशीतल्या लहान परीसारखीच आहे. मला आशा आहे की ती कायम तशीच राहील. हा क्षण माझ्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे.’

फरदीनच्या या व्हिडीओवर अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानने लिहिलं, ‘ओह माय गॉड, हे खूपच गोड आहे. तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम’. तर सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खानने लिहिलं, ‘सुपर’. याशिवाय अभिनेत्री मनिषा कोईराला, दिया मिर्झा, बॉबी देओल आणि तारा शर्मा यांनीसुद्धा हृदयाचा इमोजी पोस्ट करत या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. फरदीन आणि झायेद खान हे दोघं चुलत भाऊ आहेत. फरदीनचे वडील फिरोज खान आणि झायेदचे वडील संजय खान हे भाऊ होते.



[ad_2]

Source link

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.