Jay Pawar on 2029 Vidhansabha Election: तुम्ही 2029 च्या निवडणुकीत युगेंद्र पवारांविरोधात लढणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले…
बारामतीत आज अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक पार पडत आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान आज आमदार रोहित पवार आणि जय पवार यांनी २०२९ च्या निवडणुकीबाबत भाष्य केलं, तर कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना वाटतं आहे की, जय पवार निवडणुकीला उभे राहिले पाहिजेत. याबाबत जय पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे….मागच्या काही दिवसांपासून तुमचे जे दौरे झाले, ज्या पध्दतीने तुम्हा लोकांमध्ये जात आहात, त्यानंतर आता जय पवार विधानसभेचे उमेदवार दिसतील अशी चर्चा सुरू आहे, याबाबत एबीपी माझाशी बोलताना जय पवार म्हणाले की, चर्चा चालू आहे पण मी, सातत्याने बोलत आलो आहे, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे, त्यामुळे ही फक्त चर्चा आहे. तर रोहित पवारांचं असं म्हणणं होतं की, युगेंद्र पवार तुतारी चिन्हावर आणि जय पवार घड्याळ चिन्हावर आम्हाला पाहायला मिळतील त्यावर जय पवार म्हणाले, नाही. मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं. त्यांच्या पक्षाचा अधिकार त्यांचा आहे. अजून तर तशी काही माहिती आलेली नाही. त्यामुळे ते जर तसे बोलले असतील, त्यांच्या मनात काही ठरलं असेल, असंही पुढे जय पवारांनी म्हटलं आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.