Pune Crime News : पुण्यातील (Pune) डेक्कन नदीपात्रात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन संपवल्याची घटना घडली होती. या घटनेमागचे कारण काय? आणि आरोपी कोण हे समजू शकले नव्हते. कृषल कसबे (वय 33, रा. महात्मा फुले पेठ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. ओंकार कांबळे (वय 27, रा. धनकवडी, पर्वती) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर कृषल कसबे (वय 42, रा. गंजपेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
डेक्कन येथे गाडगीळ पूल (झेड ब्रिज) आणि छत्रपती संभाजी पुलादरम्यान नदीपात्रातील मोकळ्या जागेत 19 एप्रिलला सकाळी साडेसातच्या सुमारास कसबे यांचा मृतदेह आढळून आला होता. शस्त्राने गळा चिरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यात कांबळे याची दुचाकी हडपसरमध्ये आढळून आली आहे. दुचाकीवर रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच डिकीत तीन मोबाइलही सापडले आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी अंगावरील कपडेही बदलल्याचे निष्पन्न झाले आहे.
चौकशीत आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. कांबळे याने कसबे याच्याकडून घेतलेले 70 हजार रुपयांची परतफेड केली नव्हती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. घटनेच्या दिवशीही त्यांची भेट झाली. त्या वेळी वादातून शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.