शेटफळगढे, ता. २५ : लाकडी (ता. इंदापूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवीतील पाच विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (एनएमएमएस) शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. या परीक्षेत गौरी वणवे हिने एनटी-डी प्रवर्गातून जिल्ह्यात दुसरा, अंकिता वणवे हिने सातवा, तर मयूरी वणवे हिने आठवा क्रमांक पटकावला. तसेच, प्रणव मोरे याने ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात ४८ वा आणि अभिषेक कुंभार याने ७७ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य अन् विद्यार्थ्यांची मेहनत असल्याचे मुख्याध्यापक बापूराव ढोले यांनी सांगितले. ग्रामविद्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब ढोले, उपाध्यक्ष सदाशिव ढोले, सचिव रामचंद्र वणवे, संचालक नानासाहेब वणवे आदींसह शिक्षक, ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.