राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे ७ खासदार बाहेर पडले असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यानंतर आता आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी थेट भाजपला आव्हान दिलंय. भाजप पंजाबचा सुपुत्र भगंवत मानचं आव्हान स्वीकारणार का? मला विकत घेऊन दाखवा अशा शब्दात भगवंत मान यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. Bhagwant Mann Challenges BJP Openly
भगवंत मान यांनी चंडिगढमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले होते. आम आदमी पार्टीला फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत आणि पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केल्याचंही भगवंत मान म्हणाले होते. पंजाब सरकारने अनादराच्या विरोधात केलेल्या कठोर कायद्यानंतर भाजप अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. कारण पंजाबच्या भावनांशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही उचललेलं पाऊल मान्य करण्याची धडपड त्यांना करावी लागत आहे असं भगवंत मान म्हणाले होते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का! नगराध्यक्षाचा जातीचा दाखला ठरला अवैध, पद धोक्यातपंजाबच्या जनतेनं सातत्यानं नाकारलेल्या भाजपने राज्य आणि आम आदमी पक्षासोबत शत्रूत्वाची भूमिका घेतलीय. धमक्या देणं, आमिष दाखवणं आणि पक्षांतराच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही भगवंत मान म्हणाले.
पंजाबमध्ये २०२७मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे. भगवंत मान यांनी म्हटलं की, पक्ष सोडणारे आणि असं करणाऱ्यांचा मी निषेध करतो. एखाद्या व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. आम आदमी पार्टी सोडणारे ६-७ लोक पंजाबचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. जे गेले ते गद्दार आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.