काळेवाडी, ता. २५ : मराठवाडा मित्र मंडळाच्या एम. एम. विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६ अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाला.
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवत्ता संवर्धन अभियान २०२६-२७’ पारितोषिक वितरण समारंभ झाला. स्पर्धेत विद्यालयाने शहर व तालुका स्तरावरील गट आठवी ते बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावले. हा पुरस्कार शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्रा. नंदकुमार सागर आदींच्या हस्ते प्रदान केला. यावेळी मुख्याध्यापिका प्रभावती जट्टे व पर्यवेक्षक विजयकुमार सोळुंके यांनी शाळेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी शाळेचे अभिनंदन केले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.