भारत ही विविधतेची भूमी आहे. भारतात फक्त भाषाच नाही तर, पेहराव आणि खाण्याच्या सवयी देखील प्रत्येकाच्या वेगळ्या आहे… दर शंभर किलोमीटरवर परंपरा बदलताना दिसते. भारतात एक असे ठिकाण आहे जेथे कांदा आणि लसूणवर पूर्णपणे बंदी आहे. तर महाराष्ट्रात कांदा आणि लसूण शिवाय कोणाता पदार्थ बनतच नाही… सांगायचं झालं तर, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारतीय खाद्यसंस्कृतीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे कांदा… सूप असो, डाळ असो किंवा बिर्याणी, कांद्याशिवाय कोणताच पदार्थ उत्तम होऊ शकत नाही.. असे अनेकांना वाटते.


पण अनेकांना एक रहस्य माहिती नसेल आणि ते म्हणजे, भारताच्या एका सुंदर भागात कांदे मिळणेही अशक्य आहे? जम्मू आणि काश्मीरमधील कटरा शहरात कांद्याची लागवड, विक्री आणि वापर यावर पूर्णपणे बंदी आहे.


कटरामध्ये कांद्यावर बंदी का आहे?


जम्मू आणि काश्मीरमधील कटरा हे शहर जगप्रसिद्ध वैष्णो देवी मंदिराचे प्रवेशद्वार आहे. हा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो. आध्यात्मिक शुद्धता आणि शिस्त राखण्यासाठी शहराच्या हद्दीत कांदा आणि लसूण वापरण्यास बंदी आहे.येथील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा रस्त्यावरील ढाब्यांमध्ये कांदा आणि लसूण वापरून बनवलेले पदार्थ मिळत नाहीत. एवढंच नाही तर, स्थानिक बाजारपेठांमध्येही ते विकण्यास परवानगी नाही.


धार्मिक श्रद्धा आणि तामसिक अन्न:


हिंदू आहार पद्धतीत अन्नाची सात्त्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारांमध्ये विभागणी केली आहे.


तामसिक पदार्थ: या गटात कांदा आणि लसूण यांचा समावेश होतो. असे मानले जाते की ते मनात अस्थिरता, राग आणि सुस्ती वाढवतात.


सात्विक भोजन: येथे पूजा आणि तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या भक्तांची मने शांत ठेवण्याच्या उद्देशाने केवळ सात्विक भोजनालाच प्राधान्य दिले जाते.


चवीशी तडजोड नाही: अनेक लोकांचा असा विश्वास आहे की कांद्याशिवाय जेवण चविष्ट लागत नाही. पण कटरामध्ये मिळणारे सात्विक अन्न हे विधान खोटे ठरवते. येथील जेवण केवळ अत्यंत चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही चांगले आहे. कांद्याशिवाय बनवलेल्या या विशेष पदार्थांची चव घेऊन यात्रेकरू अवाक् होतात. स्थानिक लोक या परंपरेला केवळ एक नियम मानत नाहीत, तर आपल्या भक्तीचा एक भाग म्हणून अत्यंत निष्ठेने तिचे पालन करतात.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.