Summary -

  • महाराष्ट्रात रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलणं सक्तीचे करण्यात आले


  • १ मे पासून हा निर्णय लागू होणार आहे


  • अमित ठाकरे यांनी रिक्षाचालकांना इशारा दिला


  • मराठी बोलायचे नसेल तर आपल्या गावी निघून जा असे ते म्हणाले


गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

राज्यामध्ये मराठीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी भाषा बोलता येणं गरजेचे आहे असा निर्णय सरकारने घेतला. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत मनसेने देखील याला पाठिंबा दिला. आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी रिक्षाचालकांना थेट इशारा दिला. 'मराठी बोलायला विरोध असेल तर रिक्षाचालकांनी गावी जावे.', असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.


अमित ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज रिक्षा चालकांना मराठी सक्ती बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केलं. 'जर रिक्षा चालकांचा मराठीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध असेल तर त्यांनी त्यांच्या गावी निघून जावे.', असे स्पष्ट मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले. आता बाहेरून आलेले लोक मुंबई बंद पडणार का? त्यासाठी आम्ही आहोत. आम्ही मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे आहोत. तर मुंबई बंद कशी पडते हे आम्ही बघतो असे देखील अमित ठाकरेंनी सांगितले.

Maharashtra Politics: शिवसेनेतील नाराजी उफाळली; शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लाडकी बहीण योजनेवरूनअमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकार अधिकृतरित्या लाडकी बहिणीला पैसे देत होते. आता कोर्टानेच काही निर्णय दिला आहे. तुमच्याकडून आता होत नसले तर लाडकी बहीण योजना बंद करणार का? असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सध्या राज्यातील लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिलच्या महिन्याच्या हप्त्याचे ३००० रुपये कधी येणार याची वाट पाहत आहेत. तर ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींच्या अकाऊंटवर पैसे येणं बंद झाले आहे. अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.