सचिन कदम, साम टीव्ही
रायगड: लोणेरे येथील एका लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत (5 दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे.
Dhirendra Shastri: हेच जर दुसरं कुणी केलं असतं तर....; शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा संजय राऊतांनी घेतला समाचारकाही दिवसांपूर्वी लोणेरे येथील लॉजवर एका 22 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलीसतपासात समोर आलेल्या महितीनुसार आरोपीने पीडित तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने तिचा खून केला.
थेट PMPML बस चोरी करण्याचा प्रयत्न; दिवसाढवळ्या पुण्यातील डेक्कन परिसरात थरारया घटनेमुळे गोरेगाव परिसरात संतापाची लाट पसरली होती. गुन्हा घडल्यानंतर आरोपी मालदार पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याची 8 ते 10 पथके मागावर होती. अखेर सहा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी रात्री ठाणे परिसरातून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळआज आरोपीला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध याधीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले आणि यामागे आणखी काही करणे आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.