गुहागर : गेली दीड वर्षे तालुक्यातील एका टपाल कार्यालयात आलेली टपाल पोस्टमनने वितरित केली नसल्याची घटना पोस्टमास्तरांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये उघडकीस आली आहे. येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरून नव्याने रुजू झालेल्या पोस्टमास्तरने केलेल्या पाठपुराव्यामध्ये सदर प्रकार समोर आला आहे.
तालुक्यातील एका कार्यालयामध्ये एक पोस्टमन कार्यरत आहे. येथील ग्रामस्थांकडून आलेली टपाले मोबाईलवर ट्रेकिंग रिपोर्ट आला असताना आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत, म्हणून त्यांनी संबंधित पोस्ट कार्यालयात विचारणा सुरू झाली. त्या कार्यालयामध्ये नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तरांकडे अनेक तक्रारी आल्याने त्यांनी संबंधित पोस्टमनकडे याबाबत विचारणा करायला सुरुवात केली. मात्र त्यावर पोस्टमन काहीच उत्तर देत नव्हता.
Beed News: पोस्ट ऑफिस आहे की जनरल स्टोअर?; पत्रे दुकानात अन् कर्मचारी सुस्त; नागरिक संतप्त, सेवेेचा लाभ मिळणार तरी कसा?अखेर त्या पोस्टमनच्या घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्या पोस्टमनच्या घरी दोन पोतडी भरलेली टपाले आढळून आली. ज्यामध्ये अनेकांचे बँकांची लिलाव नोटीस, बँक पुस्तके, धनादेश पुस्तके, आधारकार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी सर्टीफिकेट, तलाठी यांच्यासाठी २०२४ मध्ये आलेली पत्रे, हायस्कूल यांना मुंबई विद्यापीठातून आलेली पत्र, कॉलेजची पत्रे, मोजणीची नोटीस आदी दीड वषपिक्षा जास्त कालावधीमधील टपाले मिळून आली.
Ichalkaranji Firing News : इचलकरंजीत पोलिसादेखत गुंडावर गोळीबार, भरवस्तीत प्रकाराने एकच धावाधाव; जखमी सांगलीचा; हल्लेखोर पसारदरम्यान, हा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला असून पोस्ट निरीक्षक हिमांशू जोशी यांनीही सदर घटनेची पाहणी केली आहे. जिल्हा कार्यालयातूनही अधिकारी संबंधित पोस्ट कार्यालयामध्ये कार्यवाहीसाठी येणार आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.