ठाणे : सिमेंटच्या गोण्यांखाली गुप्त कप्पे तयार करून परराज्यातील विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल एक कोटी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील बेलापूर-ठाणे रोडवरील डी. वाय. पाटील स्टेडियमजवळ शुक्रवारी (ता. २४) गस्त घालत असताना ठाणे-१ भरारी पथक क्रमांक एकने संशयित ट्रक थांबवून तपासणी केली. ट्रकमध्ये वंडर सिमेंटच्या गोण्या आढळल्या. त्या बाजूला केल्यानंतर खाली बनवलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले. बॉक्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित व मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
Mumbai News: मिठीतील भ्रष्टाचारावर प्रशासन गप्प का? स्थायी समितीत तीव्र पडसादया कारवाईत एकूण एक हजार २६५ बॉक्स म्हणजेच १० हजार ९२९ लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दारूबंदी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विदेशी मद्य आणि ट्रकसह एकूण एक कोटी ४५ लाख २३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालक दिनेश कैलास नाथ आणि अनिल कुमार श्यामलाल नायक यांना अटक करण्यात आली आहे.
काहींचा आग्रह, तर कुणाला हवी मुदत! मराठीच्या मुद्द्यावरून रिक्षा संघटनांत गट दोन पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईपेण पोलिस ठाण्यातील हवालदार प्रकाश कोकरे आणि खोपोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर एका महिलेच्या मोबाईलवर अश्लील गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे रायगड पोलिसदलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण येथील महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या मोबाईल व्हॉट्सॲपवर कोणतेही शासकीय काम नसताना दोन्ही अधिकाऱ्यांनी गैरजबाबदारीने संपर्क साधत अश्लील स्वरूपाचे गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आली होती. मंगळवारी (ता. २१) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हवालदार प्रकाश कोकरे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी एकत्र मद्यपान केल्यानंतर संबंधित महिलेच्या मोबाईलवर वारंवार कॉल करून अश्लील स्वरूपाचे संभाषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.