• माढा तालुक्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू


  • विजेचा धक्का लागल्याचा प्राथमिक अंदाज


  • पतीवर छळाचे आणि घातपाताचे आरोप


  • पोलिस तपास सुरू, गुन्हा दाखल


  • दोन लहान मुलांवर आईचे छत्र हरपले



माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे एका विवाहितेचा विजेचा धक्का लागून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाग्यश्री रोहिदास क्षीरसागर (वय ३६) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या पतीविरोधात माढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री यांचा विवाह २०११ साली रविंद्र रोहिदास क्षीरसागर यांच्याशी झाला होता. रवींद्र हे पेशाने शिक्षक आहे. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, कालांतराने पतीकडून भाग्यश्री यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असे, शिवीगाळ करत असे, तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास दिला जात होता.

Shocking : पोलिस अधिकाऱ्याकडून तरुणीवर बलात्कार, स्पर्धा परिक्षेच्या तयारीत मदत करतो म्हणाला, हॉटेलवर नेलं अन्....

घटनेच्या दिवशी घरात निष्काळजीपणे उघड्या विद्युत तारा ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. याच तारांमुळे भाग्यश्री यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का बसल्यानंतर त्या खाली कोसळल्या आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून, नातेवाईकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

या प्रकरणी विशाल श्रीमंत गवळी (रा. पेनूर, ता. मोहोळ) यांनी फिर्याद दिल्यानंतर माढा पोलिसांनी आरोपी पती रविंद्र क्षीरसागर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे दोन लहान मुलांवर आईचे छत्र हरपले आहे. परिसरात या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.