वडगाव मावळ, ता. २६ : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या पुढाकाराने गो-सेवा सन्मान अभियान निमित्त सोमवारी (ता.२७) वडगाव येथे भजन दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वारकरी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी दिली.
भारतातील सर्व देशी गाईंचे संवर्धन, योग्य संगोपन, सुरक्षा, सन्मान, सेवा आणि देशी गाईंना संवैधानिक दर्जा प्राप्त व्हावा या हेतूने वारकरी सांप्रदाय, संत समाज, गो भक्त यांच्या वतीने भजन दिंडीचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत पोटोबा महाराज मंदिर ते तहसिल कार्यालयापर्यंत ही भजन दिंडी काढली जाणार आहे. या गो सन्मान अभियानासाठी व भजन दिंडीच्या आयोजनासाठी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाने प्रामुख्याने पुढाकार घेतला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.