बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






अखेर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा गेला महिनाभर दौडत असलेला 7 सामने अपराजित असलेला रथ रोखला. पंजाबच्या 223 धावांचा राजस्थानने राजेशाही थाटात पाठलाग करत 4 चेंडू आणि 6 विकेट राखून पंजाबचा पराभव केला. मात्र या पराभवानंतरही पंजाबचे गुणतालिकेतील अव्वल स्थान अबाधित राहिले, तर राजस्थान तिसऱ्या स्थानावर पोहोचली.


पंजाबचे 223 धावांचे सामन्यात रंगत आणणार हे निश्चित होते आणि वैभव सूर्यवंशीने नेहमीच्याच भन्नाट शैलीत पंजाबच्या गोलंदाजीचे पिसे काढत 16 चेंडूंत 43 धावा ठोकल्या. त्याने 5 षटकार आणि 3 चौकार लगावतच 42 धावा काढल्या. राजस्थानच्या 51 धावा झाल्या असतानाच तो बाद झाला. मग यशस्वी जैसवालने मोर्चा सांभाळत 123 पर्यंत स्कोअर नेला. त्यानेही 51 धावा काढल्या. मात्र डोनोवन फरेराने 52 धावांची आक्रमक खेळी करत शुभम दुबेच्या साथीने 77 धावांची अभेद्य भागी करत संघाच्या सहाव्या विजयावर मोहोर उमटवली. फरेराच्या खेळामुळे राजस्थानला पंजाबचा विजयरथ अडवता आला. त्यामुळे फरेराच सामन्याचा मानकरी ठरला.


त्याआधी गेल्या महिनाभरात पंजाबने सलग सात सामने अपराजित राहात सहा विजयांची नोंद केली होती. त्यांना एकाही सामन्यात पराभव पत्करावा लागला नव्हता. अखेर राजस्थानने त्यांचा विजयरथ रोखण्याची किमया दाखवली. पंजाबने प्रभसिमरन सिंग (59), प्रियांश आर्य (29), कूपर कोनोली (30) आणि श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजीच्या जोरावर दीडशे धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र पूर्ण स्पर्धेत फारशी चमक न दाखवू शकलेल्या मार्कस स्टॉयनिसची बॅट आज प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडली. त्याने 22 चेंडूंच्या खेळीत 6 षटकार आणि 4 चौकार खेचत नाबाद 62 धावा केल्या. त्याच्या या झंझावातामुळे पंजाब 222 धावांचे जबर आव्हान उभारू शकली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.