कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली गावातील अत्याचार (Kolhapur Video Viral Case) प्रकरणात मुख्य आरोपी शाहिद सनदे याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 साली शाहिदने आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार पुढे आली असून, या प्रकरणी कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात शाहिदचा जवळचा मित्र शाहरुख देसाई यालाही कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Video Viral Case)
कराड येथून ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान शाहिद सनदे याने दोन ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी पीडित तरुणींवर अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. शाहिद आणि शाहरुख हे दोघेही एकमेकांचे निकटचे मित्र असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. कोल्हापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(Kolhapur Video Viral Case)
आज दोघांनाही वडगाव कोर्टात हजर केले होते. शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांनाही कोर्टात हजर केले होते. शाहिद सनदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपासासाठी सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.(Kolhapur Video Viral Case)
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, बहिणीच्या मैत्रिणीसोबत शाहिदने सगळ्यात आधी जवळीक साधली. महाविद्यालयात कार्यक्रमाच्या दरम्यान सगळ्यात आधी पीडित मुलीसोबत सेल्फी घेतला. त्या फोटोचा फायदा घेत शाहिदने पीडित मुलीला आपल्यासोबत बोलण्यास भाग पाडले. इतकच नाही तर सेल्फी फोटोची भीती घालत शरीर सुखाची मागणी केली. आरोपी शाहीदने दोन ते तीन वेळा पीडित मुलीवर अनेक आलिशान हॉटेलवर अत्याचार केले आणि व्हिडिओ बनवले. त्याच व्हिडिओचा गैरवापर करत वारंवार पीडित मुलीकडे शरीर सुखाची मागणी केली.
इतकच नाही तर पीडित तरुणीला शाकाहारी असताना मांसाहार करण्यास जबरदस्ती देखील तो करत होता. मात्र पीडित मुलीने मांसाहार करण्यास दिला नकार, आमचा धर्म चांगला आहे असंही शाहिद सनदे याने पीडित तरुणीला समजावले असल्याचे पिडीत तरूणीने तक्रारीत म्हहटलं आहे.
तपास पूर्ण व्हायचा असल्याने कोल्हापूर पोलिसांनी शाहिद सनदे याची पोलीस कस्टडी वाढवून घेतली. शाहिद सनदे याच्या मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ त्याचा मित्र शाहरुख देसाई याने मागितले. या आधारावर दोघांची चौकशी करण्यासाठी दोघांचीही कस्टडी हवी असल्याचे पोलिसांनी कोर्टासमोर मांडले. पोलिसांच्या विनंतीनुसार कोर्टाने दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.