[ad_1]

नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती समोर आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनियरिंग विभागाने असं संशोधन केलं आहे, ज्यामुळे रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार आहे. विशेष म्हणजे घरातील साध्या पिठापासून तयार झालेलं हे “कल्चर मीडिया”…शंभर वर्षांपासून चालत आलेल्या परदेशी मक्तेदारीला थेट आव्हान देणार ठरणार आहे. कुठल्याही रोगाचं अचूक निदान करायचं असेल तर सूक्ष्मजीवांचं कल्चर करणं अत्यावश्यक असतं.पण यासाठी लागणारं “कल्चर मीडिया” इतकं महाग आहे की अनेक ठिकाणी चाचण्या मर्यादित राहतात. प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये वापरलं जाणारं हे माध्यम दशकानुदशकं दोन प्रमुख प्रकारांवर अवलंबून आहे.

मात्र नागपूर विद्यापीठच्या मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनियरिंग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. माधुरी ठाकरे यांनी विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले याच्या मार्गदर्शनात यावर आठ वर्षे मेहनत घेऊन हे संशोधन पूर्ण केलं असून त्याला पेटंट सुद्धा मिळालं आहे.

किमतीत मोठा फरक पडणार

या संशोधनाचा फायदा जगभरातील असंख्य प्रयोगशाळा आणि सुष्म जीवांचा उपयोग करून उत्पादन घेणाऱ्या उद्योगांमध्ये सुष्म जीव संवर्धनासाठी शाश्वत पोषण माध्यमाचा पर्याय उपलब्ध झाला असून त्याच्या किमतीत मोठा फरक पडणार आहे. असं संशोधन करणाऱ्या डॉ माधुरी ठाकरे आणि विभाग प्रमुख डॉ.दयानंद गोगले यांनी सांगितलं.



[ad_2]

Source link

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.