पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर येथे झालेल्या अत्यंत चुरशीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी संतोष बोराटे रिंगणात होते. मात्र, त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या विशाल थोरात यांनी त्यांचा दारूण पराभव केला. थोरात यांनी बोराटे यांचा 304 मतांच्या फरकाने पराभव करत सरपंचपदाची खुर्ची काबीज केली आहे. (Rupali Chakankar)
नांदूर ग्रामपंचायतीची निवडणूक रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि समर्थकांसाठी मोठी प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत सरपंचपदासाठी चाकणकर यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे रिंगणात होते. मात्र, त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या विशाल थोरात यांनी त्यांचा दारूण पराभव केला. थोरात यांनी बोराटे यांचा 304 मतांच्या फरकाने पराभव केल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर अडचणीत आल्या होत्या, त्यांच्यावरती अनेक आरोप झाले. याच दरम्यान त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. त्यानंतर आता त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्या भावाचा पराभव झाला आहे.
संतोष देशमुखांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिला आहे. 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. (Massajog Election Result)
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया 28 एप्रिलला पार पडली. या निवडणुकीमध्ये 84 टक्के मतदान झाले होते. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर ही निवडणूक होत असून यामध्ये आश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केले होते. काल झालेल्या मतदानात गावातील 2 हजार 84 मतदारांपैकी 1 हजार 744 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांच्या फरकाने पराभव केला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.