महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)


विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आली. विधान परिषदेसाठी एकूण 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील.


विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)


विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालं आहे. कुठल्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील. भाजपकडून 6, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि मविआकडून 1 उमेदवारांचा अर्ज दाखल झाला आहे.


भाजपकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (BJP Candidate Vidhan Parishad Election 2026)



  1. सुनील कर्जतकर

  2. माधवी नाईक

  3. संजय भेंडे

  4. विवेक कोल्हे

  5. प्रमोद जठार

  6. प्रज्ञा सातव


शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (Shivsena Candidate Vidhan Parishad Election 2026)



  1. नीलम गोऱ्हे

  2. बच्चू कडू


राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (NCP Ajit Pawar Candidate Vidhan Parishad Election 2026)



  1. झिशान सिद्दीकी


शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026)


महाविकास आघाडी-



  1. अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)


विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)


विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)



  • उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)

  • नीलम गोऱ्हे (शिवसेना)

  • शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)

  • अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

  • गोपीचंद पडळकर (भाजप)

  • रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)

  • राजेश राठोड (काँग्रेस)

  • प्रवीण दटके (भाजप)

  • रमेश कराड (भाजप)


विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)



  • प्रज्ञा सातव


विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)



  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026

  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026

  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026

  • मतदानाची तारीख: 12 मे 2026

  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.

  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता

  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026


राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:



संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार…भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत…, विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.