मुंबई : एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने ( HUL ) आपल्या आईस्क्रीम व्यवसायाच्या विभाजनानंतरचे पहिले निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी दमदार निकाल नोंदवले आहेत. याशिवाय आपल्या भागधारकांसाठी मोठा लाभांश घोषित केला आहे. या लाभांशाची रेकाॅर्ड तारीखही जाहीर केली आहे.




अंतिम लाभांश

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२६ साठी प्रति शेअर २२ रुपये केला आहे. लाभांशासाठीची रेकॉर्ड तारीख २३ जून आहे. या तारखेपर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांनाच लाभांश मिळेल. यापूर्वी, कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ साठी प्रति शेअर १९ रुपयांचा अंतरिम लाभांश दिला होता.




निव्वळ नफा

त हिंदुस्तान युनिलिव्हरचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत २१% वाढून २,९९४ कोटी रुपये झाला. मागील वर्षी हा नफा २,४६४ कोटी रुपये होता. महसूलही ८.१% वाढून १६,१७२ कोटी रुपयांवर पोहोचला.




तिमाहीतील खर्च

एचयूएलने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत एफएमसीजी उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारा महसूल ८.१३ टक्क्यांनी वाढून १६,१७२ कोटी रुपये झाला. तर एकूण खर्च ७.२ टक्क्यांनी वाढून १६,६१५ कोटी रुपये झाला. इतर उत्पन्नासह एकूण उत्पन्न ५.०१ टक्क्यांनी वाढून १६,५८० कोटी रुपये झाले आहे. कंपनीचा EBITDA ३,८४१ कोटी रुपये होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढला आहे. सुधारित परिचालन कार्यक्षमतेमुळे ईबीआयटीडीए मार्जिन २३.७ टक्के झाला. कंपनीच्या कर खर्च झालेल्या पीएटीमध्ये (PAT) २० टक्क्यांची लक्षणीय वाढ होऊन तो ३,००२ कोटींवर पोहोचला.




आर्थिक वर्षातील नफा

न्यूट्रिशनलॅबच्या निर्गुंतवणुकीमुळे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा नफा १५,०५९ कोटी रुपये होता. या कालावधीत एकूण महसूल ४.६ टक्क्यांनी वाढून ६५,२१९ कोटी रुपये झाला.




मागणी मजबूत

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, प्रिया नायर म्हणाल्या, अनुकूल स्थूल आर्थिक धोरणांमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मागणीचे वातावरण मजबूत राहिले. कंपनीने वाढीला चालना देण्यासाठी विभागांचे एकत्रीकरण, वाढीव गुंतवणूक, मागणी निर्माण करण्याची क्षमता बळकट करणे आणि संघटनात्मक सुसूत्रता यांसारख्या उपाययोजना केल्या आहेत.




शेअर्स घसरला

नफ्यात वाढ होऊनही, ३० एप्रिल रोजी हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स घसरले. शेअऱ्स २.८०% घसरून २,२४९.६० रुपयांवर आला. कंपनीचे बाजार भांडवल घसरून ५.२१ लाख कोटी रुपयांवर आले. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० जून रोजी होणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.