चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणवले जाणारे अभिनेते राजेश खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत राहिलं. त्यांच्याइतकी लोकप्रियता क्वचितच दुसऱ्या कुठल्या कलाकाराने अनुभवली असेल. त्यांचे ‘आराधना’, ‘आनंद’, ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, ‘हाथी मेरे साथी’, ‘दो रास्ते’, ‘नमक हराम’, ‘आप की कसम’ असे अनेक चित्रपट गाजले. याच चित्रपटांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. मात्र त्यांनी डिंपल यांच्याशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता अभिनेत्री मुमताज यांनी राजेश खन्ना जर अंजु महेंद्रू हिच्यासोबत असते तर आजही जिवंत असते असं म्हटलंय.


मुमताज यांनी विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यात बोलताना त्या म्हणाल्या, 'राजेश खन्ना माझी मैत्रीण अंजू महेंद्रूच्या प्रेमात होता. पण, त्याने १६ वर्षीय डिंपल कपाडियाबरोबर अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंजूला त्याबाबत काहीच कल्पना नव्हती. पण, आजही ती त्याच्या प्रेमात आहे. ती आजही त्याच्याबद्दल बोलते. जेव्हा माझं लग्न झालं होतं, तेव्हा मी व माझे पती अंजूकडे जात असू. ती आमचा उत्तमप्रकारे पाहुणचार करत असे. मला माहीत होतं की ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. जेव्हा राजेश खन्नाने तिला सोडून डिंपल कपाडियाशी लग्न केल्याचं समजलं, तेव्हा मला आश्चर्य वाटलं.'

तुम्ही नशिबाला बदलू शकत नाही

मुमताज म्हणाल्या, 'मला हे अपेक्षित नव्हतं. मला आजही असं वाटतं की जर राजेश खन्ना अंजूबरोबर राहिला असता, तर तो आजही जिवंत राहिला असता. अंजू त्याची फुलासारखी काळजी घ्यायची. जेव्हा तो आजारी होता तेव्हा ती त्याच्या घरी राहून त्याची काळजी घ्यायची. त्याच्या खाण्या-पिण्याची, औषधांची ती काळजी घेत असे. अंजू खूप चांगली होती. पण, तुम्ही नशिबाला बदलू शकत नाही.'


'जेव्हा राजेश खन्नाने डिंपल कपाडियाशी लग्न केलं, तेव्हा मी अंजूला याचं कारण विचारलं होतं. त्यावर अंजू म्हणालेली की मला माहीत नाही, मी एका पार्टीमध्ये होते, तिथेच मला समजलं की त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिला तिच्या बॉयफ्रेंडने इतक्या वर्षांच्या नात्यानंतर सोडलं म्हणून राग आला नाही. तिला स्वत:ला त्याच्यावर थोपवायचं नव्हं. तिला वाईट वाटले असणार, मात्र तिने तिचं दु:ख कधी दाखवलं नाही.' राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकदा अंजु त्यांची काळजी घेत होत्या. राजेश खन्ना यांचं २०१२ ला निधन झालं.

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.