Marathi Entertainment News : स्टार प्रवाह वाहिनीने कालच नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. पाठराखीण असं या नव्या मालिकेचं नाव आहे. प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. मालिकेचा प्रोमोही नुकताच रिलीज करण्यात आला.


आदेश बांदेकर यांच्या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. दोन बहिणींची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. पण ही मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक आहे याची चर्चा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली.


सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी प्रोमोवर केलेल्या कमेंट्समधून ही मालिका 2007 मध्ये स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका सपना बाबुल का बिदाई या मालिकेचा रिमेक आहे असं म्हटलं जातंय. ही मालिकाही साधना आणि रागिणी या दोन बहिणींची गोष्ट होती. लहानपणी आई वारल्यामुळे साधना तिच्या मामांकडे राहत असते. ती सुंदर असल्यामुळे रागिणीचं लग्न ठरत नसत. त्यानंतर साधना रागिणीच्या लग्नाची जबाबदारी घेते अशी गोष्ट या मालिकेची होती.


या मालिकेत शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार अशी चर्चा आहे. तर काहीजण अक्षर कोठारी आणि हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत असं म्हटलं जातंय. आता नेमके कोण कलाकार नायक म्हणून दिसणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.


आता ही नवी मालिका कधी सुरु होणार ? कोणत्या मालिकेची जागा ही मालिका घेणार ? हे अजून उघड झालं नाहीये. त्यामुळे प्रेक्षकही या नव्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.