निदा खान आणि इम्तियाज जलील: नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एमआयएम पक्ष आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून पोलिसांनी निदा खानला (Nida Khan) अटक केली होती. यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा संबंध थेट नाशिकमधील धर्मांतरण (Nashik TCS Case) प्रकरणाशी जोडला होता. या आरोपांना इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना चोख प्रत्युत्तर दिले. पालकमंत्री संजय शिरसाट हे पोलीस तपास अधिकारी आहेत का? यापूर्वी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवेळी त्यांनी मी पोलिसांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करतो, अशी आतासारखी भूमिका का घेतली नाही, असा सवाल इम्तिजाय जलील यांनी उपस्थित केला. (Chhatrapati Sambhajinagar Crime news)


यावेळी इम्तियाज जलील यांनी निदा खान हिच्याबाबतही उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे दिली. एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आरोप करण्यात येतो, तेव्हा कोर्ट त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत तो निष्पाप असतो. ‘इनोसंट, अनटिल प्रुव्हन गिल्टी, हे न्यायव्यवस्थेचे तत्व आहे. त्यामुळे एखाद्यावर आरोप झाले म्हणजे तो दोषी ठरत नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तोपर्यंत त्या मुलीला अधिकार आहे की, ती जामिनाची मागणी करु शकते. ही कायदेशीर तरतूद आहे.  सत्र न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन नाकारला म्हणून ती लगेच गुन्हेगार ठरत नाही, तिला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.


मात्र, गेल्या काही वर्षांत आपल्या देशात आरोप झाल्यानंतर लोकांना मिडिया ट्रायलमध्ये दोषी ठरवले जात आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एखादी व्यक्ती दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत, ते का करत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. एखादी मुलगी आमच्या शहरात सापडली म्हणून त्याचा संबंध थेट इम्तियाज जलीलशी जोडायचा. याप्रकरणात पोलिसांना मला काही विचारायचे असेल तर ते विचारतील. पण एखाद्यावर आरोप झाले की त्याला लगेच फासावर लटकवा, हे धोरण योग्य नाही. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या मुलीचा दहशतवाद्यांशी संबंध असता तर पोलिसांनी आतापर्यंत तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट किंवा लूकआऊट नोटीस जारी केली असती. केवळ एफआयआरमध्ये तिचं नाव आलं म्हणून तिला दोषी ठरवणे योग्य नाही. तिच्यावर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. पण चित्रं असं निर्माण केलं जात आहे की, तिने मोठी हत्या केली आहे किंवा तिचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.



आणखी वाचा


Nashik TCS Case Nida Khan Arrested: टीसीएस धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला लपवून ठेवणारा एमआयएमचा ‘तो’ नगरसेवक कोण?




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.