बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






मुंबईतील अंधेरी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टेम्पो पार्क करताना मुलाचा चुकून अ‍ॅक्सिलेटरवर पाय पडला आणि टेम्पो थोट वडिलांच्या अंगावर गेला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.


रामदीन सुंदर यादव (46) असे मयत वडिलांचे तर शुभम रामदीन यादव असे आरोपी मुलाचे नाव आहे. अंधेरीतील मरोळ भागात मकवाना रोडवरील बीएमसी पे अँड पार्कमध्ये बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.


लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विलेपार्ले येथील सहार कार्गोमधून मालाची वाहतूक केल्यानंतर शुभम आणि त्याचे वडील बीएमसीच्या पार्किंगमध्ये टेम्पो पार्क करण्यासाठी आले. टेम्पो पार्क करत असताना रामदीन हे वाहनाला पुढे-मागे घेण्याबाबतच्या सूचना देत होते. यादरम्यान चुकून शुभमचा पाय अ‍ॅक्सिलेटर पडला. यामुळे टेम्पो अनियंत्रित झाला आणि रामदीन यांना धडकला. या धडकेत रामदीन गंभीर जखमी झाले. त्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.


पोलीस हवालदार हेमकांत किनी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, एमआयडीसी पोलिसांनी शुभम यादव याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे शुभमला मानसिक धक्का बसला आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.