Nashik TCS Case Nida Khan Arrested: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान (Nida Khan) हिच्या 40 दिवसांच्या लपाछपीनंतर ती अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. नाशिक (Nashik) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे निदा खानला लपवण्यासाठी MIM नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केली होती. मतीन पटेलने दोन महिन्यांपूर्वीच कौसर पार्क येथे एक घर विकत घेतले होते, याच घरात त्याने निदा आणि तिच्या कुटुंबाला (आई, वडील, भाऊ आणि आत्या) आश्रय देण्यात आला होता. पोलिसांनी मतीन पटेलचा मोबाईल जप्त केला असून, त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी काही वेळापूर्वी एमआयएमचे नेते आणि  माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यानंतर काही वेळातच जलील (Imtiaz Jaleel) यांच्या घरी  पोलिस दाखल झाल्याची माहिती समोर आली आणि संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली.


इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या घरी पोलीस दाखल झाल्याची माहिती समोर आली, काही वेळापूर्वी यांनी निदा खान अटके प्रकरणात माध्यमांची संवाद साधला होता, त्यानंतर काही वेळातच इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले गुन्हे शाखेचे पीआय संभाजी पवार, आर्थिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी इम्तियाज जलील यांच्या घरी दाखल झाले होते अशी माहिती समोर आली होती. निदा खान अटक प्रकरणांमध्ये एमआयएमच्या एका नगरसेवकाचे नाव पुढे आले, या नगरसेवकानेच निदा खानला मदत केल्याचे समोर आलं आहे, यानंतर काही वेळातच पोलीस जलील यांच्या घरी दाखल झाल्याने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं, आर्थिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी जलील यांच्या घरी पोहोचले, त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झाली, ज्याप्रमाणे शिवसेना नेते आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर आरोप केले, याचं अनुषंगाने तपासासाठी पोलीस गेले आहेत का याची चर्चा सुरू झाली होती,(Imtiaz Jaleel)


Police on Imtiaz Jaleel) Meet:  भेटीनंतर पोलिसांनी सांगितलं कारण


इम्तियाज जलील यांच्या भेटीनंतर आणि चर्चेनंतर बाहेर आल्यानंतर गुन्हे शाखेचे पीआय संभाजी पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी आलो होतो.. मी कोणत्याही प्रशासकीय कामासाठी आलेलो नव्हतो, निदा खान प्रकरणाबाबत विचारले असते ते म्हणाले हे प्रकरण मला माहिती नाही, त्याबाबतीत माझ्यावर कोणती जबाबदारी नाही, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो, असे पोलिसांनी सांगितलं आहे.


Nashik TCS Case Nida Khan Arrested: अशा प्रकारे निदा खानला अटक करण्यात आली


नाशिक पोलिसांच्या एसआयटी (SIT) तपासात तांत्रिक माहितीच्या आधारे निदा खान संभाजीनगरमध्ये असल्याची खात्री पटली. यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईचे नियोजन केले. पोलिसांनी सलग दोन दिवस त्या संशयास्पद इमारतीवर लांबून नजर ठेवली. आरोपीला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी गणवेश टाळून साध्या वेशातील पथके तैनात केली होती. कारवाईसाठी सरकारी गाड्यांचा वापर न करता, खासगी आणि विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करण्यात आला. निदा खान घरात असल्याची खात्री पटताच रात्री पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या छापा टाकला आणि निदा खानला ताब्यात घेतले.





आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.