चित्रा वाघ: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी समाजातील ‘विकृती’वर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “आज अत्याचार केवळ रस्त्यावरच नाही, तर सुरक्षित समजल्या जाणाऱ्या घरातही होत आहेत,” असे सांगताना त्यांनी रक्ताच्या नात्यांमधील आरोपींच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे.


चित्रा वाघ म्हणाल्या की, “एखाद्या आईच्या डोळ्यात भीती दिसते, एखाद्या ताईला कामावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, तेव्हा ती संपूर्ण समाजाची वेदना असते. स्वतःचे घर सुरक्षित वाटत होते, मात्र आता राहत्या घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. अत्याचार कोण करतंय? तर बाप, काका, मामा आणि भाऊ. रक्ताची नातीच जेव्हा आरोपी असतात, तेव्हा त्याचे अधिक वाईट वाटते. सरकार उपाययोजना करत आहेच, मात्र आजोबांनी आपल्या नातीसोबत कसे वागावे, हे काय आता सरकार सांगणार आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


शक्ती कायद्याची चौकट आयपीसीमध्ये होती. आता नवीन न्यायव्यवस्था आली, नव्या कायद्याशी सुसंगत असं काम होतं. त्यात मागील अधिवेशनात सुधारणा केल्या आणि अंमलात आलाय. डिजिटल ब्लॅकमेल आणि कायद्याच्या कक्षेत आणण्याचे काम केले आहे. ॲसिड हल्ल्यातील महिलेची ओळख समोर न येण्यासाठी देखील तरतूद केली आहे.  शक्ती कायदा प्रारंभी मसुदा होता, मात्र आता यात सुधारणा केल्या आहेत.  सरकारच्या जबाबदारीचा हा विषय आहे, सरकार गांभीर्याने घेत आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपींना पॅरोल न देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने पुण्यातील आरोपीची मुक्तता पॅरेलवर कशी केली? हे देखील समोर येईल, असे चित्रा वाघ म्हणाल्या.


Chitra Wagh: राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न


चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, 93 हजार महिला बेपत्ता झाल्या, असं बोललं जातं, मात्र 67 हजार महिलांना मुंबई पोलिसांनी घरी सुरक्षित पाठवलं आहे. प्रत्येक वेळी बेपत्ता होणारी मुलगी पळवून नेणारी नाही. तर लग्नासाठी पळून जाणाऱ्या मुली असतील, त्यांचा देखील यात समावेश आहे.रिकव्हरीचा रेट देखील मुलींच्या अत्याचाराबाबत चांगला झाला आहे. पोक्सोमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढले आहे. पोक्सोसाठी स्वतंत्रपणे न्यायालये सुरु आहे. दोषारोप पत्र देखील 60 दिवसात दाखल होतायत. या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप त्यांनी यावेळी विरोधकांवर केला.


Chitra Wagh: त्यावेळी माझ्या विरोधात गुन्हे दाखल


13 वर्षात 1 लाख 37 हजार मुलं-मुली बेपत्ता झाले होते. आधी काय व्हायचं तर केसेस बंद व्हायच्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात यासंदर्भात वेगळा सेल आहे आणि त्याचा रिपोर्ट दर महिन्याला जातो. महिला अत्याचारासंदर्भात विशेष अधिवेशनाची देखील काहींनी मागणी केली.  सप्टेंबर 2021 मध्ये साकीनाका, हिंगणघाट निर्घृण अशी घटना घडली. पुण्यात सामूहिक अत्याचार झाले. मी विशेष अधिवेशन घ्या, असं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं.  मात्र, माझ्या विरोधात गुन्हे दाखल झाले, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.


आणखी वाचा


Nashik TCS Case Nida Khan Arrested: टीसीएस धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला लपवून ठेवणारा एमआयएमचा ‘तो’ नगरसेवक कोण?




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.