ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी


four killed in Maharashtra truck accident : सातारा तालुक्यातील कासरतळे येथे आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक आयशर ट्रक अचानक ५० फूट खोल दरीत कोसळल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सातारा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाचे पुनर्वसन झाल्यामुळे ते आपल्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य आयशर ट्रकमध्ये भरत होते. सर्व साहित्य भरून हा ट्रक निघाला होता. पण त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या ट्रकचा अंदाज चुकला आणि तो थेट ५० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकचे साहित्य भरत असतानाच हा अपघात घडल्याने कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.

सावत्र आईवर तरूणाचा बलात्कार, पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती, नागपूरमधील धक्कादायक घटना

या ट्रकमध्ये केवळ घरातील साहित्यच नव्हते, तर कुटुंबातील पाळीव जनावरेदेखील होती. या भीषण अपघातात ट्रकमधील काही जनावरांचाही जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने या अपघातात ट्रकचा चालक बचावला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघात नेमका झाला कसा? याचा तपास पोलिसांकडून कऱण्यात येत आहे.

Gold Price Today : सोन्याचे दर घसरले! सराफा बाजार उघडताच २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर कोसळले; पाहा आजचे ताजे भाव

अपघाताचाआवाज होताच कासरतळे परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढले असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.