बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






इंडोनेशियाच्या माऊंट डुकोनोवर ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने या दुर्घटनेत तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन पर्यटक हे सिंगापूरचे होते. तर अन्य दोन पर्यटक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या ठिकाणी जाण्यास बंदी असूनही 20 पर्यटक गेले होते. ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने यात तिघांचा मृत्यू झाला आहे. हरमहेरा द्वीप येथील या ज्वालामुखी स्फोटानंतर जवळपास 10 किलोमीटर उंचीपर्यंत राखेचा धूर उडाला. जवळपास कोणतेही गाव किंवा शहर नसल्याने धोका टळला. ज्वालामुखीचा स्फोट झाला त्यावेळी जवळपास 20 पर्यटक होते. यात 9 सिंगापूरचे आणि उर्वरित इंडोनेशियाचे होते. आतापर्यंत 15 जणांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.