Dhurandhar 2 on OTT: रणवीर सिंह आणि आदित्य धर यांच्या 'धुरंधर 2: द रिव्हेंज' (Dhurandhar 2 the Revenge) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यावर आता हा चित्रपट ओटीटीवर गर्जना करायला सज्ज झाला आहे. भारतभरात तब्बल 1140 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नेट कलेक्शन करत जागतिक स्तरावर 1791 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. आता चित्रपटगृहात धुरंधर 2 पाहून झाला असला तरी ओटीटीवर एका नव्या ट्विस्टसहित हा चित्रपट पाहता येणार आहे. थिएटरपेक्षा या चित्रपटाची ओटीटी आवृत्ती वेगळी असणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी सोशल मीडियावर याबद्दलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Dhurandhar 2 On OTT)
धुरंधर 2 हा चित्रपट 14 मे रोजी रात्री ओटीटीवर स्ट्रीम होणार असल्याचं म्हटलं जातंय. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे. तर परदेशातील प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवरही हा चित्रपट उपलब्ध असेल. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या डिजिटल आवृत्तीचे नाव ' धुरंधर 2: द रिव्हेंज ( रॉ & अनदेखा ) असं असणार आहे. अनेकांनी या टायटलचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. शिवाय ओटीटी वरील या आवृत्तीचा रनटाईम चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रनटाईमपेक्षा अधिक दिसतोय. 3 तास 49 मिनिटांच्या थिएटर आवृत्तीऐवजी ओटीटीवर तीन तास 52 मिनिटांची आवृत्ती दाखवली जाणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांना काही नवीन आणि न पाहिलेली दृश्यही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
#DhurandharTheRevenge is coming on #Netflix (Internationally) on 14 May 2026 (15 May in some timezones)
With a Tagline of "Raw & Undekha"
2-3 min extended runtime (could just be credits) & Uncensored abuses are expected.
India Release: 14 May on #JioHotstar pic.twitter.com/LlyU2GdAC1
— Divyansh (@Speaks_Div) May 8, 2026
मिळालेल्या माहितीनुसार भारतात हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होऊ शकतो तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना तो नेटफ्लिक्स वर पाहता येणार असल्याची चर्चा आहे.मात्र निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान धुरंधर फ्रेंचाईजी इथेच थांबणार नसल्याचे संकेतही निर्मात्यांनी दिले आहेत. आदित्य धर अजूनही धुरंधरच्या दुनियेतून बाहेर पडला नसून या वर्षाअखेरपर्यंत धुरंधरचा फ्रॅंचाईजीबाबत मोठी अपडेट मिळू शकते अशी चर्चाही रंगली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.