आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये अजूनही अजब वेगवेगळ्या प्रथा आहेत. घाना या देशात ‘सेक्सच्या बदल्यात नोकरीची’ अजब प्रथा आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी आता या प्रथेला गुन्हा घोषित करण्याची मागणी केली आहे. घाना सरकार आता या प्रथेला गुन्हा मानून थेट कारवाई करण्याच्या तयारीत आहे. घानामध्ये फार पूर्वीपासून ही प्रथा सुरु आहे. लोकांना या बद्दल माहिती आहे. पण कोणीही जाहीरपणे बोलायला तयार नाही. 1 मे रोजी कोफोरिडुआ येथे आयोजित एका टाऊन हॉल कार्यक्रमात हा मुद्दा उपस्थित झाला. एका विद्यार्थीनीने भरती प्रक्रियेत सुरु असलेल्या लैंगिक असमानतेवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राष्ट्रपती महामा म्हणाले की, “या प्रथेविरुद्ध सध्या असलेले नियम आणि धोरणं पुरेशी नाहीत. सेक्सच्या बदल्यात नोकरीची शोषणाची खतरनाक प्रथा आहे. याचा अजिबात स्वीकार केला जाऊ शकत नाही”
“ही सर्वात खराब प्रथांपैकी एक आहे. याला दंडनीय गुन्हा बनवण्यासाठी कायदा मंजूर होणं गरजेच आहे. अनेकदा नियुक्ती करणारा पुरुष असतो. तो नोकरी देण्यासाठी रोमँटिक संबंधांची मागणी करतो. हे मान्य नाही. ही प्रथा बंद होणं गरजेच आहे” असं महामा म्हणाले. घानामध्ये लेबर कायदा आणि गुन्हा कायद्यातंर्गतलैंगिक शोषणावर बंदी आहे.घरगुती हिंसाचार रोखणाऱ्या कायद्यातंर्गतही व्यापक सुरक्षा तरतुदी आहेत. पण या कायद्यांबद्दल आंदोलकांच म्हणणं आहे की, “हे कायदे सामान्यत: नोकरी सुरु झाल्यानंतर होणारं शोषण आणि घरगुती वातावरणात जबरदस्ती विरुद्ध आहेत. नोकरी देण्याच्या बदल्यात सेक्सची मागणी या स्थितीत या कायद्याचा काही विशेष फायदा होत नाही”
खासकरुन युवा महिला टार्गेट
घानामध्ये युवक-युवती मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. सरकारी आणि औपचारिक क्षेत्रात नोकरी मिळवण्याठी मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. भरती प्रक्रिया पारदर्शक नसते. अशावेळी नोकरी देणारा खासकरुन युवा महिलांकडे अशा प्रकारची मागणी केली जाते. वकील विक्टोरिया ब्राइट यांनी म्हटलय की, “राष्ट्रपतींनी ही भूमिका घेतली, त्याचा मला आनंद आहे. सेक्सच्या बदल्यात नोकरी या शोषणाचा कधीही स्वीकार केला जाऊ शकत नाही” विक्टोरिया ब्राइट या घानाचे माजी राष्ट्रपती जॉन कुफोर यांच्या माजी कायदेशीर सल्लागार होत्या. “जेव्हा कुठला पावरफुल माणून नोकरीच्या बदल्यात सेक्सची मागणी करतो तो एक भ्रष्टाचारच आहे. सभ्य समाजात अशा घटनांचा स्वीकार केला जाऊ शकत नाही” असं ब्राइट म्हणाल्या.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.