Sambhajinagar Road Accident News : नातेवाईकाच्या हळदीला निघालेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ढोरेगाव येथे घडली. तेजल काकासाहेब प्रधान (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. या अपघातात तिचे वडील काकासाहेब गिरजाबा प्रधान (वय ४६) गंभीर जखमी झाले आहेत.


आंबेलोहोळ येथील रहिवासी असलेले काकासाहेब प्रधान मुलगी तेजलसह दुचाकीवरून बगडी येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी ढोरेगाव शिवारातील शिवना नदीच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरनेत्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

सावत्र आईवर तरूणाचा बलात्कार, पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती, नागपूरमधील धक्कादायक घटना

स्थानिकांनी तातडीने दोघांनाही गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तेजलला मृत घोषित केले. गंभीर जखमी काकासाहेब यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

TVK चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; थलापती विजय होणार तामिळनाडूचे मुख्यमंत्री, सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी

तेजल ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिने जिल्हा परिषद शाळेतून दहावीची परीक्षा ९४% गुणांसह उत्तीर्ण केली होती. सध्या ती शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होती. गुरुवारीच तिचा प्रथम वर्षाचा शेवटचा पेपर झाला होता. परीक्षेचा आनंद घेऊन घरी परतलेल्या तेजलवर दुसऱ्याच दिवशी काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Accident : साताऱ्यात काळाचा घाला! आयशर ट्रक खोल दरीत कोसळला; लहान मुलासह ४ जणांचा मृत्यू

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.