Maharashtra heavy rain forecast : राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच आता पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा आणि कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


अरबी समुद्राकडून येणारे आर्द्र वारे आणि केरळ किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज असून, विदर्भासह दक्षिण मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे.


दरम्यान, मन्नारचा आखात आणि श्रीलंका परिसरातील चक्राकार वाऱ्यांमुळे नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ११) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या प्रणालीचा परिणाम पुढील काही दिवस राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राजस्थानातील फालोदी येथे देशातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातवाशीम येथे राज्यातील सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

जळगाव आणि अकोला येथे ४२ अंश, तर वर्धा, ब्रह्मपुरी, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धाराशिव आणि परभणी येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.