Archery World Cup: रविवारी शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताच्या महिला रिकर्व्ह संघाने शानदार पुनरागमन करत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोड या त्रिकुटाने यजमान चीनचा थरारक शूट-ऑफमध्ये पराभव करत ५-४ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत सामना ४-४ असा बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये भारताने २८-२६ अशी बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.
भारतासाठी हा विजय खूप महत्त्वाचा ठरला कारण याच चीनच्या संघाने उपांत्य फेरीत १० ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाचा पराभव केला होता. २०२१ नंतर विश्वचषक स्पर्धेत भारताने जिंकलेले हे पहिले महिला रिकर्व्ह सुवर्णपदक ठरले आहे.
Asian Archery Championship 2025: तिरंदाजीत अचूक लक्ष्यभेद; आशियाई स्पर्धा, तीन सुवर्ण आणि एक रौप्यदीपिका कुमारीने आपल्या कारकिर्दीत सातवे विश्वचषक सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २०२१ मध्ये ग्वाटेमाला आणि पॅरिस येथे मिळालेल्या विजयानंतर पुन्हा एकदा तिने भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. या पदकामुळे भारताची तीन वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
एक दिवस आधी तिरंदाज साहिल जाधवने कांस्यपदक जिंकत भारताच्या पदक मोहिमेची सुरुवात केली होती. तर सिमरजीत कौरने रिकर्व्ह प्रकारात उपांत्य फेरी गाठत पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
अंतिम सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. पहिला सेट ५४-५३ असा जिंकताना दीपिका कुमारीने सलग १० गुण मिळवत आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये चीनने जोरदार पुनरागमन केले. दीपिकाचा एक नेम चुकला आणि चीनने स्कोअर बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये चीनने ५७-५६ अशी एका गुणाची आघाडी घेतली.
World Shooting Championship: इशा सिंगचा ब्राँझ धमाका! कैरो जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला आणखी एक पदकचौथ्या सेटमध्ये कुमकुमचा एक नेम चुकल्यामुळे भारताला ५४ गुणांवर समाधान मानावे लागले. चीनला विजयासाठी शेवटच्या फेरीत ९ गुणांची गरज होती, मात्र दबावाखाली त्यांना फक्त ८ गुण मिळाले आणि सामना शूट-ऑफमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये भारताच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवला. अंकिताने ९, कुमकुमने १० आणि दीपिकाने ९ गुण मिळवत भारताला २८-२६ असा विजय मिळवून दिला आणि भारताने सुवर्णपदक पटकावले
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.