मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्थानक परिसरात थुंकणे आणि कचरा टाकण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः पान, गुटखा आणि तंबाखू खाऊन प्लॅटफॉर्म, जिने, रेल्वे पूल आणि रेल्वे रुळांच्या परिसरात थुंकणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे.


पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२६ मध्ये अशा प्रकारांविरोधात विशेष मोहीम राबवत दोन हजार ६५७ प्रवाशांवर कारवाई केली. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ २२७ प्रकरणे नोंदविण्यात आली होती. त्याच्या तुलनेत यंदा कारवाईच्या संख्येत तब्बल १२ पट वाढ झाली आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईतील धरणात ८५ दिवसांचा साठा, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

दंड वसुलीतही मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षी ४२ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यंदा ही रक्कम पाच लाख ३७ हजार रुपयांहून अधिक झाली आहे. म्हणजेच दंड वसुलीत सुमारे ११७९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

स्थानकांची स्वच्छता धोक्यात

रेल्वेप्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरील कोपरे, जिन्यांच्या भिंती, एस्केलेटर परिसर, तसेच फलाटांच्या टोकांवर सर्रास थुंकताना आढळतात. त्यामुळे स्थानकांच्या स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), तिकीट तपासनीस आणि स्वच्छता पथकांच्या मदतीने विशेष तपास मोहीम सुरू केली आहे.

Mumbai: मुंबईत आरबीआय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारणार, २१० झाडांची कत्तल होणार; पर्यावरणप्रेमींची टीका जनजागृतीलाही प्राधान्य

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जात असून स्थानक परिसरात जनजागृतीही करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. मुंबईतील रेल्वे स्थानके ही दररोज लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असल्याने स्वच्छता राखण्यासाठी प्रवाशांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.