50 – 60 च्या दशकात हिंदी सिनेविश्वात अशी एक अभिनेत्री होती, जी जवळपास सर्वच निर्मात्यांची पहिली पसंती होती…. अभिनेत्रीने तिच्या करियरमध्ये दिग्गज अभिनेते राजेश खन्ना, धर्मेंद्र, मनोज कुमार यांसारख्या सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर केली आणि इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव मोठं केलं. अभिनेत्रीचं सौंदर्य, दिलखेच अदा आणि दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणीच नसून अभिनेत्री माला सिन्हा आहे, जिने ‘परवरिश’, ‘बादशाह’, ‘नया जमाना’, ‘धूल का फूल’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीवर चित्रित केलेलं ‘आपकी नजरों ने समझा, प्यार के काबिल मुझे’ गाणं आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
एक काळ असा होता, जेव्हा माला प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री होती. पण म्हणतात ना, वेळ आणि नशिब कायम एकसारखे राहत नाहीत. अशात माला सिन्हा यशाच्या शिखरावर तर चढली, पण जेव्हा अभिनेत्रीचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलं तेव्हा अभिनेत्रीचं संपूर्ण करियर उद्ध्वस्त झालं.. माला यांनी पैसा देखील प्रचंड कमवला पण एकेदिवशी त्याच पैशांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली.
प्रचंड पैसा कमावणाऱ्या माला कंजूस देखील तितक्याच होत्या. एवढंच नाही तर, घरात नोकर ठेवले तर खर्च होईल, म्हणून त्या स्वतः घरातील सर्व कामे त्याच करायच्या. एकदा माला सिन्हा यांच्या मुंबईतील घरात इनकम टॅक्सचा छापा पडला. तेव्हा त्यांच्या घराच्या बाथरुममध्ये चक्क 12 लाख रुपयांची रोकड सापडली. तेव्हा 12 लाख रुपये फार मोठी रक्कम होती. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.
वादग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या माला यांनी कोर्टामध्ये दिलेल्या कबुलीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. माला सिन्हा यांनी कोर्टात एक धक्कादायक विधान केले, जप्त झालेले लाखो रुपये मी वेश्या व्यवसायात कमवले.. अशी लेखी कबुली माला सिन्हा यांनी कोर्टात दिली. वकिलांनी सांगितल्यानुसार माला यांनी अशी कबुली दिला, नाहीतर, त्यांनी त्यांचे सर्व पैसे गमावले असते. पण त्यानंतर माला यांच्याकडे लोक वाईट नजरेने पाहायचे. अखेर त्यांना काम मिळणं देखील बंद झालं.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.