उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ची मोठी कारवाई
आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले
प्राथमिक तपासात उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आल्याने तपास तीव्र करण्यात आला आहे
पोलिसांनी पुढील तपासासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत
अजय दुधाणे, पुणे
उल्हासनगर शहरात पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हे शाखा घटक-४ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर अग्नीशस्त्रासह अटक केली आहे. रोहित सुनील मोरे उर्फ पानपाटील (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सी. ब्लॉक रोडवरील सेंच्युरी ग्राऊंड परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक-४ च्या पथकाने तत्काळ घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहितीयानंतर पोलिसांनी आरोपी रोहित मोरे याला ताब्यात घेत भारतीय हत्यार कायदा कलम ३ आणि २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने हे पिस्टल उत्तर प्रदेशातील एका अज्ञात व्यक्तीकडून विकत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला ‘उत्तर प्रदेश कनेक्शन’ लाभल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी कराया घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपासासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून आरोपीने हे शस्त्र कोणत्या उद्देशाने आणले होते, याचा शोध घेतला जात आहे. शहरात बेकायदेशीर हत्यारांची वाढती तस्करी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात घेता पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातून अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रे शहरात पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.