Andy Flower Penalty: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम रंगत आला आहे आणि प्लेऑफची चुरस आणखीनच मजेशीर झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने कालमुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. रविवारी १० मे रोजी रायपूर येथील मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५ वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सला २ गडी राखून पराभूत केले.
या पराभवामुळे मुंबई इंडियन्स आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. एका रोमांचक सामन्यात मिळालेल्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अँडी फ्लॉवर दोषी आढळले आहेत.
Nitish Rana: नितीश राणा अम्पायर भिडंत; आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन करण महागात, BCCI ने सुनावली 'ही' शिक्षामुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यादरम्यान अँडी फ्लॉवर यांचा चौथ्या पंचाशी जोरदार वाद झाला. ही घटना आरसीबीच्या डावाच्या १८व्या षटकात घडली. कृणाल पंड्याने त्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारला, पण मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षक तिलक वर्मा आणि नमन धीर हे सीमारेषेवर झेल पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर फलंदाजाला ६ धावा द्यायच्या की नाही, हे ठरवण्यासाठी पंचांनी बराच वेळ घेतला.
रीप्लेमध्ये दिसले की नमन धीरचा पाय बाउंड्री कुशनला लागला नव्हता, त्यामुळे षटकार दिला गेला नाही. अँडी फ्लॉवर या निर्णयामुळे नाराज झाले आणि ते चौथ्या पंचांशी वाद घालताना दिसले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाले. अँडी फ्लॉवर यांनी नंतर आपली चूक मान्य केली आणि सामनाधिकारी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली.
IPL 2026: आधी अडथळा आल्यानं बाद, मग वाद अन् आता BCCI नेही केली अंगकृश रघुवंशीला शिक्षा; जाणून घ्या काय झाली कारवाईमुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना अत्यंत रोमांचक झाला. विजयासाठी आरसीबीला शेवटच्या ३ चेंडूंमध्ये ९ धावांची गरज होती. त्यावेळी भुवनेश्वर कुमार ने राज अंगद बावाच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकला. त्यानंतर आरसीबीच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत सामना आपल्या नावावर केला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.