NEW TWIST IN ‘TARINI’; 'तारिणी' या मालिकेत अनेक ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. या मालिकेत सध्या नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. गेल्या काही दिवसापासून मालिकेत तारिणीच्या टीममध्ये एक नवीन ऑफिसर येणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून ती नवीन ऑफिसर कोण असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांची लागली होती.
हरप्रीत चड्ढा ही भूमिका अभिनेत्री पायल जाधव हिने साकारली होती. हरप्रीत उर्फ रेवा ही केदारची चांगली मैत्रीण असल्याचे समोर आलय. दरम्यान आता मालिकेत अजून एक मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळताय. मालिकेत पद्मिनी काकूंची भूमिका अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकरने साकारली होती. दरम्यान आता मालिकेत पद्मिनी काकूची भूमिका शीतल क्षीरसागर ही साकारणार आहे.
सिद्धीरुपा करमरकरने मालिकेत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. खांडेकर कुटुंबासोबत तिचं प्रेमाचं वागणं, मुलावर असलेलं प्रेम, तसंच त्याच्या प्रेमात इतर कोणी येऊ नये असं पद्मिनीला सतत वाटत असतं. मुलासाठी ती अनेकवेळा दुसऱ्या व्यक्तींवर अन्याय करताना कट कारस्थान करताना पहायला मिळते. दरम्यान आता सिद्धीरुपा करमर यांच्या एक्झिटनंतर ही भूमिका शीतल क्षीरसागर साकारणार आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पद्मिनी खांडेकरचा लूक शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहलं की, 'तारिणी या मालिकेतून मी नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. उत्सुकता, आर्शिवाद, आनंद, अपेक्षा आणि कुतूहल हे सगळं घेऊन मी मालिकेत येणार आहे. तुमचं प्रेम आणि आर्शिर्वाद सोबत राहू द्या.'
दरम्यान शीतल क्षीरसागर यांच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स येताना पहायला मिळताय. अनेकांनी त्यांचं कमेंट्स करत त्यांच्या नव्या लूकचं कौतूक केलय. दरम्यान शीतल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या आधी 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत होत्या. त्यांना त्या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं.
जो मालिकेत कधी नव्हताच... 'लक्ष्य'मधून काढलं या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर; म्हणाले-Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.