पान ३
----------------
खानदेशात उष्णतेमुळे
केळी लागवडीस ब्रेक
पारा ४५ अंश सेल्सिअसवर
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात शेतीकामांना मजूरटंचाईचा फटका बसत असतानाच उष्णताते कमालीची वाढ झाली आहे. यामुळे केळी लागवडीचे काम अनेकांनी पुढे ढकलले आहे. तापमान कमी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन केले आहे.
खानदेशात मागील १५ ते २० दिवसांपासून कमाल तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. त्यात किंचित वाढही अधूनमधून होत आहे. याचा फटका केळी बागांना बसत आहे. केळी कंद व रोपांच्या उगवणीस ४३ ते ४४ अंश सेल्सिअसचे तापमान प्रतिकूल असते. यामुळे सध्या केळी लागवडीस खानदेशात ब्रेक लागला आहे. तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत आल्यानंतर लागवडी सुरू होतील, असे दिसत आहे.
पूर्वहंगामी कापूस
लागवडदेखील जूनमध्येच
लहान, अल्पभूधारक शेतकरी पीक लागवडीचे नियोजन करीत आहेत. खानदेशात कापसाची लागवड अधिक असते. यामुळे कापूस लागवडीची तयारीदेखील कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी गावोगावी करीत आहेत. पण कापूस लागवडदेखील जूनमध्येच सुरू होईल अशी स्थिती आहे.
अनेकांनी महिनाभरापूर्वी खोल नांगरणी करून शेत तापू दिले. त्यानंतर रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत केले. शेत भुसभुशीत करून त्यात केळी, कापूस लागवडीचे नियोजन कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात केळी, कापूस व अन्य भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अनेक जण गादीवाफे तयार करून घेत आहेत. नंदुरबारात केळी, मिरची, कारली, टोमॅटो व अन्य पिकेही असतात. या पिकांच्या लागवडीची तयारी या भागात झाली आहे.
उष्णेतेमुळे जूनमध्ये
लागवडीचे नियोजन
खानदेशात उष्णता वाढीचे संकेत आहेत. यामुळे शेतकरी सध्या शेत लागवडीसाठी तयार करून घेत आहेत. अनेकांनी गादीवाफ्यांवर मिरची व अन्य पिकांसाठी पॉली मल्चिंगदेखील टाकून घेतले आहे. १ जून किंवा ५ जूनपर्यंत त्यात लागवड केली जाईल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.