मुलीला हळद लावण्याची लगबघ सुरू होती. घरातील प्रत्येकजण लग्नाच्या तयारीत गुंतला होता. पण क्षणार्धात या लग्न घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीच्या हळदीच्या दिवशीच वडिलांचे निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे आनंदी घराचे रुपांतर शोकात झाले. दत्तात्रय उबाळे असं वधूच्या वडिलांचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ही घटना असून परिसरातून हळहळ व्यक्त केला जातेय.


मुलीची हळद असल्यानं वडील दत्तात्रय उबाळे आनंदी होते. मात्र लग्नाच्या दिवशी अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वधूच्या वडिलांच्या निधनामुळे जमलेले पाहुणे आणि नातेवाईक शोक सागरात बुडाले. परंतु मुहूर्त ठरलेल्या आणि पाहुणे घरी जमल्यानं नातेवाईकांनी दुःख मनात ठेवत लग्नसोहळा पार पाडला. मुलीच्या हातातील मेहंदी सुकण्याआधीच वडिलांची सावली हरपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.


एका बापाच्या आयुष्यात सर्वात सुखाचा क्षण कोणता असेल तर तो आपल्या मुलीला चांगला आयुष्यभराचा साथीदार शोधून देणे आणि आनंदाश्रूने तिची पाठवणी करणे आणि एका मुलीला सुद्धा बापाचे प्रेम आयुष्यभर हवेच असते मात्र हसत हसत तिच्या लग्नात अक्षदा टाकणारा बाप हीच तर तिची मोठी ताकद असते मात्र मुलीच्या हळदीला उपस्थित असणारा बाप लग्नाला अक्षदा टाकण्यासाठी उपस्थित नसणे हे अतिशय वेदनादायी होते कारण मुलीच्या हातातील मेहंदी सुकण्या आधीच वडिलांची सावली हरपल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.


पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दत्तात्रय उबाळे (६०) यांच्या तिसऱ्या मुलीचा(हर्षदा) सोहळा मोखाडा येथे काल १० मे रोजी पार पडला. या सोहळ्याच्या दिवशी स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणि इतर धावपळ देखील करत असताना उबाळे यांची प्रकृती खालावली. म्हणून त्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिक या ठिकाणी हलवण्यात आले.

Accident News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! रस्ता ओलांडताना ट्रेलरने उडवले, आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू; भंडाऱ्यावर शोककळा

तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले ही बातमी मंडपात पसरली मात्र लग्नकार्याची घटिकामी आली होती सर्व पाहुणे जमले होते अशावेळी लग्न थांबवणे उचित नसल्याने वडील उपचार घेत आहेत असे सांगत हे लग्न कार्य पार पाडले यानंतर देखील उशिरापर्यंत नवरी मुलीला याबाबतची कल्पना देण्यात आली नव्हती मात्र मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केलेला बाप अक्षदा टाकायला नव्हता या हृदयद्रावक घटनेने सगळेच स्तब्ध झाले आहेत.


दत्तात्रय उबाळे हे तहसील कार्यालयात नोकरीला होते वयोमानानुसार सेवानिवृत्ती घेतल्यानंतर चार मुलीचे वडील असलेले उबाळे यांनी आपल्या दोन मुलींचे लग्न यादी केलेले होते. आणि हर्षदाही त्यांची तिसरी मुलगी होती यासाठी गेल्या महिनाभरापासून लग्न तयारी त्यांची लगबग होती एवढेच काय तर शनिवारी 9 मे रोजी आपल्या मुलीच्या हळदीचा कार्यक्रम देखील त्यांनी जोरात पार पाडला यानंतर काल दहा मे रोजी दुपारी लग्न होते.

राज्यात चाललंय काय? मध्यरात्री गोळीबाराचा थरार, महावितरणच्या कर्मचार्याची गोळ्या झाडून हत्या

मात्र त्याआधीच 11 वाजेच्या आसपास त्यांना अस्वस्थ जाणू लागल्याने त्यांनी घरात आराम केला मात्र तरीही बरं वाटत नसल्याने त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी जावई आणि नातेवाईकांनी त्यांना मोकळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ही घटना नवरी मुलीच कळाली मात्र उपचार सुरू आहेत.


यामुळे लग्नकार्य थांबविण्यापेक्षा ते उरकून घेऊ ते लवकरच उपचारकरून घरी परत येतील,अशी समज सर्व नातेवाईकांनी दिल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे लग्न कार्य पार पाडले आणि यानंतर तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला नातेवाईक आणि पाहुण्यांना देखील अश्रू अनावर झाल्याचे हृदयद्यावक चित्र मंडपस्थळी दिसून आले.


उबाळेंनी आपल्या नोकरीच्या काळात देखील आणि सेवानिवृत्तीनंतर देखील आपले नातेवाईक ग्रामस्थ या सर्वांच्या हृदयात एक वेगळे घर निर्माण केले होते. अतिशय धार्मिक असलेली उबाळे यांचा कोणाशीही तसा वाद विवाद नसल्याने यांच्या लग्नकार्यात आणि हळदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक आणि नातेवाईकांची गर्दी होती.


या आनंद सोहळ्यामध्ये घरात आनंदाचे वातावरण होते आणि अशातच चार मुलींचा बापअसलेले उबाळे देखील अतिशय आनंदी होते भरल्या डोळ्याने आपल्या मुलीची वरात आपल्या दारातून जाताना पाहणे हे प्रत्येक बापाचं भाग्य असतं मात्र उबाळे यांना त्याआधीच देवाज्ञा झाल्याने त्यांना हा सोहळा पाहता आला नाही आणि मुलीच्या हातातील मेहंदी सुकण्याआधीच वडिलांची सावली हरपली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.