सिरोंचा : मोबाईल चार्जिंगला लावणे एका कुटूंबासाठी जीवघेणे ठरले असून चार्जिंगदरम्यान लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार (ता. १२) सकाळी ८ वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील कोर्ला येथे घडली.
सुदैवाने यादरम्यान घरातील सदस्य तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही़. मात्र या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्यांची राखरांगोळी झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे़. प्राप्त माहितीनुसार सध्या तेंदू हंगाम सुरू असल्याने कोर्ला येथील लक्ष्मी मलाय्या तोगार यांचे संपूर्ण कुटुंबीय सकाळच्या सुमारास तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेले होते़.
Gadchiroli News: सिरोंच्यात मोबाईल चार्जिंगमुळे लागलेल्या आगीत लक्ष्मी तोगार यांचे घर राखरांगोळी; चार्जर ओव्हरहीटिंगमुळे सिरोंच्यातील घर जळून खाकयादरम्यान कुटुंबातील सदस्यांनी घरात मोबाईल चार्जिंगला लावले होते़. दरम्यान चार्जर ओव्हरहीटिंग झाल्याने स्फोट झाला़ व यामुळे घराला आग लागली. काही क्षणातच आगीने रुद्रावतार धारण करीत संपूर्ण घराला कवेत घेतले़. गावातील अनेक कुटुंब पाने तोडण्यासाठी जंगलात गेल्याने ही बाब उशिरा लक्षात आली़. त्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़. मात्र या आगीत घरातील कपडे, तांदूळ, जीवनावश्यक साहित्यांसह संपूर्ण घर भस्मसात झाले़.
Manchar Home Fire : मंचरजवळ निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; १५ लाख रुपयांचे नुकसान, जीवितहानी टळलीयात लक्ष्मी तोगार यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे़. त्यामुळे तोगार कुटूंबियांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.