छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मालिकांसोबतच त्यातील पात्र आणि कलाकारही प्रेक्षकांचे आवडते असतात. मालिकांमधून हे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. अशीच अभिनेत्री जिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने सौंदर्याने वेड लावलंय ती म्हणजे 'तुला जपणार आहे' मालिकेतील मीरा. मालिकेत अभिनेत्री महिमा म्हात्रे ही मिरची भूमिका साकारतेय. यात दोन बहिणींची कथा दाखवण्यात आलीये. महिन्याभरापूर्वीच महिमाचा साखरपुडा झाला. मात्र आता माहेर सोडून जायचं म्हटल्यावर महिमाने तिला वाटणारी धाकधूक बोलून दाखवलीये.
महिमा म्हणाली, 'मालिकेत घोडेस्वारीचा सीन करत असताना अपघात होऊन सुद्धा अगदी पंधरा दिवसातच मी कामावर रुजू झाले होते. असं करण्याचा धाडस मला माझ्या आईकडूनच मिळालं आहे. माझी आई केवळ गृहिणी नसून वडिलांच्या व्यवसायातही तिचं लक्ष असतं. आणि तिथेही आई सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम सांभाळते. घर आणि व्यवसाय यांचा समतोल कसा साधावा हे मला आईकडून शिकायला आवडेल. सुरुवातीला शिक्षिका असलेल्या आईने संसारासाठी नोकरी सोडली पण हार न मानता तिने व्यवसायात उत्तम यश मिळवलं याचा मला अभिमान वाटतो.'
View this post on Instagram
A post shared by ᴍ ᴀ ʜ ɪ ᴍ ᴀ ᴍ ʜ ᴀ ᴛ ʀ ᴇ (@mahimamhatre)
महिमा पुढे म्हणाली, 'नुकताच माझा साखरपुडा झाला आहे. काही दिवसात लग्नही होईल त्यामुळे लग्नानंतर घरच्या माणसांना आणि विशेषतः माझ्या आईच्या हातच्या जेवणाला मी खूप मिस करेन. तरीही माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात आईने केलेल्या मार्गदर्शन आणि तिने सांगितलेल्या ट्रिक्स या माझ्यासोबत असतीलच असा आम्हाला विश्वास आहे.' महिमाचा एप्रिल महिन्यात रोशन विचारे याच्यासोबत साखरपुडा झाला. आता चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अंगणात तुळशी वृंदावन अन् दारात झोपाळा, 'ठरलं तर मग'च्या प्रियाने 'इथे' बांधलंय स्वप्नातलं फार्म हाऊस, रायगडमधील...Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.