Tamil Nadu Assembly news : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या दररोज नवनवे ट्विस्ट येत आहेत. बहुमत चाचणीच्या तोंडावर मद्रास हायकोर्टाने मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाच्या एका आमदाराला मतदान करण्यापासून रोखले होते. सुप्रीम कोर्टाने बुधवारी हायकोर्टाच्या या निकालावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. अत्यंत भयानक, असा या निकालाचा उल्लेख करत कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली.
नेमकं काय आहे प्रकरण?
विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे आमदार श्रीनिवास सेतुपती हे तिरुपत्तूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी डीएमके पक्षाचे उमेदवार के. आर. पेरियाकरुप्पन यांचा केवळ एका मताने पराभव केला आहे. त्याविरोधात त्यांनी मद्रास हायकोर्टात रिट याचिका दाखल केली करत सेतुपती यांना बहुमत चाचणीमध्ये मतदान करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
हायकोर्टाने ही याचिका स्वीकारत बुधवारी सेतुपती यांना मतदानात सहभागी होता येणार नाही, असा आदेश दिला होता. त्याविरोधात सेतुपती यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने रिट याचिकेवरून निकाल दिल्ल्याबद्दल मद्रास हायकोर्टावर नाराजी व्यक्त केली. हे अत्यंत भयानक आहे. यावर निवडणूक याचिका उपाय असल्याचे एकीकडे मान्य करत हायकोर्टा रिट याचिका कसे स्वीकारता, असा सवाल कोर्टाने केला.
MLA expelled : आमदाराने विधानसभेतच मारली पलटी; बाहेर येताच पक्षातून बडतर्फ, मुख्यमंत्र्यांना जाहीर पाठिंबा देणं भोवलं...एका मताचा घोळ
पेरियाकरुप्पन यांनी केलेल्या दाव्यानुसार, तिरुपत्तूर मतदारसंघातील एक टपाली मत चुकीच्या मतदारसंघात गेले. त्यामुळे निकालावर परिणाम झाला. हे मत तिरुपत्तूर मतदारसंघात आले असते तर दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली असती. सेतुपती हे केवळ एका मताने विजयी झाले आहेत.
Supreme Court : लोकशाही हायजॅक करू देणार नाही! सुप्रीम कोर्टाने पाच दिवसांतच घालविली भाजप नेत्याची आमदारकी, काँग्रेसची एक जागा वाढली...या दाव्यावर सेतुपती यांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना रिट याचिका ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. कायद्यानुसार निवडणूक याचिकेवरच सुनावणी व्हायला हवी. त्यानंतरही मद्रास हायकोर्टाने सेतुपती यांच्याविरोधात निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने मात्र सेतुपती यांच्या वकिलांचे म्हणणे मान्य करत हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली. तसेच हायकोर्टातील पुढील सुनावणीही थांबविण्याचे आदेश दिले. दरम्यान, सेतुपती यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांना आज झालेल्या बहुमत चाचणीत मतदान करता आले नाही. निकाल विलंबाने आल्याने सेतुपती यांची निराशा झाली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.