बीड जिल्ह्यातील दोन आमदार पंडित आणि क्षीरसागर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात होत असलेल्या बैठकीचे मला निमंत्रण नाही याबद्दल मी हक्क भंग दाखल करू शकतो असं नमूद केलं. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. “आमदार विजयसिंह पंडित यांचं बीडवरती खूप प्रेम उतु चाललं आहे असं दाखवतात. मात्र बीड मधले उद्योग गेवराईला नेत आहेत. बीड MIDC, रेशीम उद्योग हे गेवराईला नेत आहेत” असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.
“अजितदादाअसताना विमानतळासाठी मांजरसुंब्याचा पण सर्वे करा असं मी म्हणालो होतो. बॅक वॉटर योजनेसाठी आम्ही सर्वच स्तरावर पाठपुरावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित दादांना दोनदा सभा घ्याव्या लागल्या. नगरपालिका निवडणुकीत जे काय केलं आहे ते अजित दादांनी केलं आहे. विकास काम असो की भावनेचा विषय. आम्ही अर्ध्या रस्त्यातून, चौकातून पळून जात नाही” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
आम्ही दररोज रस्त्यावर फिरून काम करतोय
“बीड वरती प्रेम दाखवतात आणि सगळं गेवराईला घेऊन जातात. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका, या मतदारसंघाने आम्हाला दोनदा आमदार केले आहे. आम्ही दररोज रस्त्यावर फिरून काम करत आहोत” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
योग्य तो निर्णय मोठे साहेब करतील
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण भेटलो असं सुनील तटकरे सांगत आहेत. याबद्दल संदीप क्षीरसागर यांना विचारलं असता ते म्हणाले की, “त्या बाबतीत मला काही माहित नाही. मात्र अजित दादा होते शेवटची भेट झाली तेव्हा, ते मला म्हणाले होते आपण एकत्र येणार आहोत. पण त्यावर एवढं काही राजकारण सुरू आहे, त्यामुळे मी त्यावर काहीच बोललो नाही.योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचा परिवार ते करतील सगळे”
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.