लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलिसांचे व गुन्हे शाखा युनिट ६ चे पथकाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल पाच लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!याप्रकरणी वैशाली संजय खेतमाळीस (वय ४८, रा. माळीमळा, लोणी काळभोर) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (१३ मे) रोजी लोणी काळभोर व गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, माळी मळा परिसरात एक महिला गुटख्याचा साठा करून विक्री करीत आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेथील हॉलमध्ये मोठमोठ्या उघड्यावरच ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये डायरेक्टर स्पेशल पान मसाला, विमल पान मसाला, आरएमडी, रजनीगंधा, वी-१ तंबाखू, तुलसी तंबाखू, शॉट प्रीमियम च्युइंग टोबॅको यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
या छाप्यात पोलिसांनी एकूण ५ लाख ७ हजार १९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले हे पदार्थ असून, त्यांची विक्री आणि साठवणूक गंभीर गुन्हा मानला जातो. तरीदेखील लोणी काळभोर परिसरात खुलेआम असा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला..पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून नमुने सीलबंद केले असून उर्वरित साठा ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी वैशाली खेतमाळीस यांच्याविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एका घरात पोहोचला कसा? यामागे कोणते पुरवठादार आहेत? पुणे जिल्ह्यातील इतर भागातही याचे नेटवर्क कार्यरत आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून, आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.