‘नदी प्रहारींना’ डावलल्याचा आरोप नाशिक : ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत कार्यरत अधिकृत नदी प्रहारींना महापालिकेकडून डावलल्याचा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी नंदिनी नदी प्रहारी प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या पत्रानुसार, महापालिकेतर्फे १ मेस उन्नत नाशिक अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात काही नदी प्रहारींचा सन्मान करण्यात आला. मात्र, वरुणा नदीसाठी सातत्याने आणि अविरत कार्यरत अधिकृत नदी प्रहारींचा सन्मान झाला नाही. त्याचप्रमाणे, नंदिनी नदीसाठी नियुक्त अधिकृत नदी प्रहारी हे प्रशासनासोबत प्रत्यक्ष जमिनीवर काम करत असताना, त्यांना पूर्णपणे डावलून दुसऱ्याच व्यक्तींचा सन्मान केल्याचा आरोपही केला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.