''यशोदा''मध्ये बारावीत सान्वी पवार प्रथम


सीबीएसईच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम



सातारा, ता. १५ : येथील यशोदा पब्लिक स्कूलने सीबीएसई इयत्ता बारावी परीक्षेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
परीक्षेत विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवला. गुणवंत विद्यार्थ्यांत सान्वी पवार (८७.८ टक्के) हिने प्रथम, रुद्रा शहा (८३.८) हिने द्वितीय, तर ईश्वरी नागटिळक (८०.६) हिने मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांमध्येच नव्हे, तर आत्मविश्वास, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणातही प्रगती करावी, हीच संस्थेची भूमिका आहे.’’
यावेळी उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘यशोदा पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षणपद्धती, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.’’ प्राचार्या अमिता डोगरा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


W19301
सान्वी पवार


W19302
रुद्रा शहा


W19303
ईश्वरी नागटिळक
-------------------------------

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.