दुधेबावी : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रथमवर्ग अधिकारी झाला. भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील निवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक नामदेव शेंडे यांचा मुलगा सोहम यांची नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये देशामध्ये (आयएफएस रँक -७५) मिळवून वनविभागात प्रथमवर्ग अधिकारी म्हणून निवड झाली आहे.


सोहम यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्र शाळा (राजुरी), माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (फलटण) येथे, तर पदवीचे शिक्षण वालचंद कॉलेज (सांगली) येथून झाले आहे.


गेल्या दोन वर्षांपासून ते दिल्लीत यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होते. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील तरुणांना एक नवा आदर्श घालून दिला आहे. या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.